बुधवारी सकाळी ११.२५ ते दुपारी १.५५ पर्यंत गणेश पूजनाचा मुहुर्त – दा. कृ. सोमण

यावर्षी बुधवार ३१ ॲागस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. श्री गणेश पूजनासाठी मध्यान्हकाळ महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी बुधवार ३१ ॲागस्ट रोजी सकाळी ११-२५ पासून दुपारी १-५५ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. जर यावेळेस  गणेशपूजन करणे शक्य झाले नाही तर संपूर्ण दिवसभर कधीही गणेश पूजन केले तरी चालेल असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
ज्येष्ठा गौरी शनिवार ३ सप्टेंबर रोजी रात्री १०-५६ वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही गौरी आणण्यास हरकत नाही. रविवार ४ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. ज्येष्ठा गौरींचे विसर्जन चंद्र मूळ नक्षत्रात असल्याने  सोमवार ५ सप्टेंबर रोजी रात्री ८-०५ पर्यंत करावे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्या दिवशी समुद्राच्या भरतीच्या वेळा सकाळी ११-१६ आणि रात्री ११-२७ अशा असून ओहोटीच्या वेळा पहाटे ४-३६ आणि सायं. ५-२२ अशा आहेत.
पुढच्यावर्षी सन २०२३ मध्ये श्रावण अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९  दिवस उशीरा  मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading