ध्येय गाठण्यासाठी कष्टासोबतच देशाप्रती योगदान द्या… विश्वास नांगरे – पाटील यांनी जागवला नविन पिढीच्या मनात ‘विश्वास’

अपयशाला न घाबरता आपले ध्येय गाठण्यासाठी अपार कष्टासोबत प्रत्येकाने देशाप्रती योगदान द्यावे. असा ‘विश्वास’ महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे आयकॉन अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी नविन पिढीच्या मनात जागवला. त्याचबरोबर मोबाईल आणि समाज माध्यमांच्या (सोशल मिडिया) विळख्यात अडकलेल्या नव्या पिढीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या देशातील प्रेरणास्थाने, देशप्रेम, नातेसंबंधाची जाणीव, सामाजिक बांधिलिकी याची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

Read more

जुन्या पेन्शन योजनेबाबत शिक्षण विभागाकडून अभ्यास सुरू – मुख्यमंत्र्यांचे शिक्षक मेळाव्यात प्रतिपादन

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. या संदर्भात शिक्षण विभागाकडून अभ्यास केला जात असून, शिक्षकांना सरकारकडून न्याय दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असावा, अशी भूमिका मांडून युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येतील, ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

Read more

भिवंडी आणि ठाणे खाडीत अवैध रेती उपसा करणाऱ्या 97 लाखांचे बार्ज आणि सक्शन पंप जिल्हा प्रशासनाने केले नष्ट

जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची कारवाई सुरूच असून आज मुंब्रा खाडी व काल्हेर ते कोन खाडी दरम्यान केलेल्या कारवाईत पाच बार्ज व 2 सक्शन पंप असा एकूण सुमारे 97 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Read more

अवैध गौण खनिज उत्खननाविरुद्धच्या मोहिमेत दोन बार्ज आणि दोन सक्शन पंपावर कार्यवाही

जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतूक आणि उत्खनन या विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच त्यांच्या अधिनस्त असलेल्या तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयांमार्फत धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

Read more

बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालयात रस्ता सुरक्षा आणि अवयव दानाचा जागर

विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियान आणि अवयव दान जागृतीचा जागर भारतीय सैन्य दल दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला.

Read more

शहर सौंदर्यीकरणाच्या कामांचा आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे अभियानातंर्गत हाती घेतलेली सर्व कामे युद्धपातळीवर सुरू असून शहराचे नवे रुप नागरिकांना अनुभवयास मिळत आहे. शहरातील भिंतीवरील आकर्षक आणि बोलकी चित्रे लक्ष वेधून घेत असून सौंदयीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

Read more

ठाण्यातील कन्या शाळेचा वीज पुरवठा कापण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन

ठाण्यातील कन्या शाळेचा वीज पुरवठा कापण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी आज आंदोलन केलं.

Read more

महापालिकेच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटल्यानं काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद झाला होता.

Read more