विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियान आणि अवयव दान जागृतीचा जागर भारतीय सैन्य दल दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला.
यावेळी इंस्पेक्टर मयूर यांनी आपल्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना रहदारीचे नियम, कायदे आणि आचार संहिता सांगून मार्गदर्शन केले. यावेळी एक online प्रश्नमंजुषा घेऊन विजेत्या स्पर्धकांना हेल्मेट देऊन गौरविण्यात आले.