महापालिकेच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटल्यानं काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद झाला होता. ठाणे कारागृहाच्या बाजूला के व्हीला जवळ रस्त्याच्या दुरूस्तीचं काम सुरू असताना जेसीबी मशीनचा धक्का लागल्यामुळे ठाणे महापालिकेच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटला आणि हजारो लिटर पाणी वाया गेले. पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचा-यांनी दुरूस्तीचं काम हाती घेऊन तासाभरात पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading