जिल्ह्यात आज कोरोनाचे ९ नवीन रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ९ नवीन रूग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात २५ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९६९ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज एक रूग्ण आढळला. सध्या २ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत २ हजार १६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकही रूग्ण नाही. सध्या २ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९६२ रूग्ण दगावले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ८ रूग्ण आढळले. सध्या १९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये एकही रूग्ण नाही. आत्तापर्यंत १ हजार ४०७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ० रूग्ण, आत्तापर्यंत ६६६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, तर आत्तापर्यंत ४८७ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण, २ रूग्णांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये एकही रूग्ण नाही. तर आत्तापर्यंत १ हजार २५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading