भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागामार्फत विविध कार्यक्रम संपन्न

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त ठाणे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत कोर्ट नाका येथील टाऊन हॉल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Read more

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहिम, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्वाधार योजनेविषयी माहिती देणे, आरोग्य शिबिर, मान्यवरांची भाषणे, संगीत रजनी आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ठाणे जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिली. अनुसूचित जाती आणि सर्व प्रकारचे पीडीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक आणि सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, तसेच त्याचा उद्देश साध्य व्हावा, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने एप्रिल महिन्यात राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातही आजपासून जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिरे, योजनांची माहिती देणे, आश्रमशाळा, वसतीगृहे या ठिकाणी व्याख्यान, चर्चासत्रे, ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे व मेळावे, आश्रमशाळा, वसतीगृहांमध्ये स्वच्छता मोहिम, प्रबोधनपर कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन विषयक जनजागृती, पथनाट्य, लाभार्थ्यांचा मेळावा, रक्तदान शिबिरे, संविधान जनजागृती शिबिरे, तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप व प्रमाणपत्र वाटप, गीत गायन स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील जनता, वसतीगृहांतील विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन इंगळे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना केले.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी कोर्टनाका येथे आंबेडकर अनुयायांची गर्दी

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६६वा महापरिनिर्वाण दिन आंबेडकर अनुयायांनी धीरगंभीर वातावरणात साजरा केला.

Read more

कोणतेही निर्बंध नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी – आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती आज त्यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली.

Read more

बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली होती.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती त्यांना अभिवादन करून साधेपणानं साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती आज त्यांना अभिवादन करून साधेपणानं साजरी करण्यात आली.

Read more

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नियमाचे पालन करुन साध्या पध्दतीने साजरी करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता महसूल आणि वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन, मंत्रालयाकडून साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता यंदाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती शासनाच्या नियमावलींचे पालन करून घरातूनच अभिवादन करत साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more