डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर, कोर्ट नाका ते ठाणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा चित्ररथ, लेझीम, तुतारी, दांडपट्टा, बॅण्ड आदी पथके सहभागी झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे शहरातील मुख्य शासकीय इमारती तसेच पूल, पादचारी पूल यांच्यावर निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली. ठाणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, महापालिका मुख्यालय, गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, जुना आणि नवीन कळवा खाडी पूल, कोपरी, आनंदनगर येथील पादचारी पूल, वागळे इस्टेट येथील वर्तुळाकार कमान आदींवर ही रोषणाई करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading