डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी कोर्टनाका येथे आंबेडकर अनुयायांची गर्दी

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६६वा महापरिनिर्वाण दिन आंबेडकर अनुयायांनी धीरगंभीर वातावरणात साजरा केला. यानिमित्तानं ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दादरच्या चैत्यभूमीवर दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी गेले होते. चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायांचा जनसागर लोटला होता. ठाणे शहरात विविध ठिकाणी असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला या अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. कोर्टनाका येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मध्यरात्रीपासूनच अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायांनी गर्दी केली होती. अनेकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या लावून बाबासाहेबांना अभिवादन केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading