कोणतेही निर्बंध नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी – आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती आज त्यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली. कोरोनामुळे दोन वर्ष आंबेडकर जयंती साजरी करण्यावर अनेक निर्बंध होते. पण यंदा मात्र हे निर्बंध हटवण्यात आल्यामुळे आंबेडकर जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या आंबेडकर जयंतीवर कोणतेच निर्बंध नसल्यामुळे आंबेडकर अनुयायांमध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे यंदा फटाके, बँडच्या तालात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर त्यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आंबेडकर अनुयायांनी जयभीमचा एकच जल्लोष केला. अनेकांनी मेणबत्त्या पेटवून बाबासाहेबांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ठाणे महापालिकेतर्फेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. आंबेडकर जयंती निमित्त आज एक भव्य मिरवणुकही काढण्यात आली होती. ढोल, ताशा, बँडच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. मर्दानी खेळ, ढोल, ताशे, बँडपथक आणि लेझीमच्या गजरात ही मिरवणूक संपूर्ण शहरभर फिरत ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विसर्जित झाली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading