डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती त्यांना अभिवादन करून साधेपणानं साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती आज त्यांना अभिवादन करून साधेपणानं साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंबेडकरांची जयंती साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं होतं. त्यामुळं आंबेडकर अनुयायांनी अभिवादन करून जयंती साजरी केली. ठाणे महापालिकेच्या विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. तसंच टेंभी नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading