ठेकेदाराकडून अतिक्रमित उद्यान नागरिकांसाठी होणार खुले

माजीवड्यातील उद्यान ठेकेदाराकडून अतिक्रमित केल्याची माहितीच सहायक आयुक्तांना नसल्याची बाब उघडकीस आली आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

Read more

कोपरी परिसरात पाण्याची अवाच्यासवा बीले आल्याने भारतीय जनता पक्षाचा आंदोलनाचा इशारा

शहरातील इतर भागांप्रमाणेच कोपरी आणि चेंदणी कोळीवाडा परिसरातही मीटरद्वारे पाणीपुरवठ्याची अवाच्या सवा बिले आल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोपरीवासियांनीही एल्गार पुकारला असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read more

दिवा आगासन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करणारे अभियंते आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची निरंजन डावखरेंची मागणी

दिवा आगासन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करणारे अभियंते आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीची जबाबदारीही पालिकेचीच – आमदार संजय केळकर

नागरिक वृक्ष कर भरत असल्याने गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातील झाडांची छाटणी करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेचीच आहे असा आग्रह धरत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याने सोसायट्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read more

वेदांता प्रकल्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त झालेल्या कार्यक्रमादरम्यान शिवसेना-भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी

वेदांतावरून झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याने काही काळ गोंधळ उडाला.

Read more

वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं वाहतुकीचं नियोजन करणं गरजेचं – निरंजन डावखरे

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं वाहतुकीचं नियोजन करणं गरजेचं आहे अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

बारवी धरणातील प्रकल्पग्रस्तांना महापालिकेत नोकरीवर रुजू करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी राज्यमंत्री कपिल पाटलांचा पुढाकार

बारवी धरणातील प्रकल्पग्रस्तांना महापालिकेत नोकरीवर रुजू करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
पदवीधर उमेदवारांना एमएस-सीआयटी व टायपिंग परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुदत द्यावी. तसेच वयोमर्यादा उलटल्यामुळे अडचणीत आलेल्या उमेदवारांना नोकरीवर रुजू करून घेण्यासाठी नोकरी देण्यासाठी काढलेल्या २०१७ च्या अध्यादेशाची तारीख गृहीत धरावी, यासाठी राज्य सरकारकडे विनंती केली जाणार आहे. दरम्यान, या वेळी बारवी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली.
बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न सात वर्षांपासून रखडला होता. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी बैठका घेतल्यानंतर, ४११ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे ठिकाण देण्याबाबत लॉटरी काढण्यात आली. सर्व उमेदवारांना स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने १५ ऑगस्ट रोजी नियुक्तीपत्रे देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, पोलिसांचे चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्यकीय चाचणी, उमेदवारांची अर्हता आणि तांत्रिक अडचणींमुळे उमेदवार रुजू होऊ शकले नव्हते. त्यामुळे श्री. कपिल पाटील यांनी बुधवारी पुन्हा बैठक घेतली. या बैठकीला माजी आमदार दिगंबर विशे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांमधील काही उमेदवार पदवीधर आहेत. मात्र, त्यांच्याकडे एमएस-सीआयटी व टायपिंग परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे सध्या त्यांना पदवीधर असूनही चतुर्थश्रेणीची नोकरी मिळू शकेल. त्यांच्यावरील अन्याय दूर करून त्यांना लिपिक पदाची नोकरी मिळण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव मुदत देण्याची विनंती राज्य सरकारकडे केली जाणार आहे. तर नोकरीचा प्रश्न सात वर्षांपासून रखडल्याने काही उमेदवारांची वयोमर्यादा उलटली. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी राज्य सरकारकडे नोकरीच्या वेळी काढलेल्या अध्यादेशाची तारीख गृहीत धरण्याचा आग्रह केला जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. वय कमी असलेल्या उमेदवारांना १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवेत दाखल करून घेतले जाणार आहे.
उमेदवारांना चारित्र्य तपासणी दाखला देण्यासाठी मुरबाड येथे शिबीर भरविण्याची सुचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दूरध्वनीवरून पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांना केली. तर संबंधित उमेदवार रुजू झाल्यानंतर संबंधित महापालिका वा आस्थापनांनी वैद्यकीय चाचणी करण्याची सुचना करण्यात आली आहे.
बारवी धरणाच्या पाण्यात गेलेल्या अतिरिक्त जमिनीचे आठ दिवसांत ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या बैठकीत वाढीव टप्पा २ चे भूसंपादन व मोबदला, खासगी वन जमिनीवरील भूसंपादन व मोबदला, प्रकल्पबाधीत कुटुंबांना पुनर्वसन व सुविधा आदींबाबतही चर्चा करण्यात आली.

Read more

ठाणे शहरात अंतर्गत मेट्रोमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी एक समिती नेमली जाणार

ठाणे शहरात अंतर्गत मेट्रोमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी एक समिती नेमली जाणार आहे.

Read more

घोडबंदर परिसरातील पाण्याची उग्र समस्या सोडवण्यासाठी येत्या शुक्रवारी बैठक

घोडबंदर परिसरातील पाण्याची उग्र समस्या सोडवण्यासाठी एक कृती आराखडा ठरवला जाणार असून त्यासाठी येत्या शुक्रवारी बैठक होणार आहे.

Read more

शिधावाटप कार्यालयाची वाटचाल आयएसो मानांकनाच्या वाटचाल

गेली अनेक वर्षे पडझड झालेल्या चाळवजा वास्तूत हजारो सर्वसामान्य नागरिकांना सेवा देणारे शिधावाटप कार्यालय आयएसओ मानांकनाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे.

Read more