वेदांता प्रकल्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त झालेल्या कार्यक्रमादरम्यान शिवसेना-भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी

वेदांतावरून झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याने काही काळ गोंधळ उडाला. एकीकडे वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला माजीमंत्री कृपाशंकर सिंग उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी आणि समोरासमोर असल्यामुळे हा गोंधळ दिसून आला. एकीकडे स्वाक्षरी अभियान सुरू असतानाच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. एकमेकांच्या विरोधात दोन्ही गटांकडून जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम त्यातल्या संदर्भापेक्षा गोंधळामुळेच जास्त गाजले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading