दिवा आगासन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करणारे अभियंते आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची निरंजन डावखरेंची मागणी

दिवा आगासन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करणारे अभियंते आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. निकृष्ट काम आणि खड्ड्यामुळे अपघात होऊन एका तरुणाचा जीव गेल्याने दिवा आगासन रस्त्याचा ठेकेदार आणि पालिका अभियंत्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी डावखरे यांनी दिव्याच्या भाजपच्या शिष्टमंडळासह महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या रस्त्याचे मागील पाच वर्षापासून काम सुरू आहे. अतिशय संथगतीने या रस्त्याचे काम सुरू असून ते नियमित होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने काम या ठिकाणी झाल्याच्या तक्रारी देखील वारंवार अनेक नागरिकांनी केल्या आहेत. त्याचबरोबर गणेश नगर, बेडेकर नगर, आगासन पट्ट्यामध्ये या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून काम रखडलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि अर्धवट कामाचा फटका एका तरुणाला बसला असून निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. खड्ड्यामुळे या तरुणाचा हकनाक जीव गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर, संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपने केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading