बुलेट ट्रेनबाबत महापौरांचे वक्तव्य खोटे, शिवसेनेची दुटप्पी भूमिका – संजय वाघुलेंची टीका

बुलेट ट्रेनला जागा देण्याच्या प्रस्तावावर वेबिनार महासभेत चर्चाही झाली नाही. मात्र संबंधित प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याच्या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचे महापौरांचे वक्तव्य धादांत खोटे आहे. एकिकडे टीएमटी बससाठी केंद्र सरकारकडे निधी मागायचा, पण केंद्र सरकारच्याच बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध करायचा ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी केली आहे. खोटे बोलणारा महापौर हा प्रथमच ठाणे शहराने पाहिला असावा, असा टोलाही वाघुले यांनी लगावला. बुलेट ट्रेन ही ठाण्याच्या हद्दीतून जाणार असून, ठाण्याला थांबा मिळणार आहे. त्यातून ठाणेकरांचीच सोय होणार आहे. एकिकडे रिंगरूट मंजूर करायचा, पण बुलेट ट्रेनसारख्या वेगवान वाहतुकीला अडथळा आणायचा, ही शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. भाजपाचा बुलेट ट्रेनला पाठिंबाच आहे. पण केवळ केंद्राला विरोध म्हणून शिवसेनेने प्रस्ताव दप्तरी दाखल केला. त्यातून महापौरांनी खोटे वक्तव्यही केले, ही संतापजनक बाब आहे, अशी टीका संजय वाघुले यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading