कोरोना संकट काळात जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून कार खरेदीचा प्रस्ताव रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

कोरोना संकटाच्या काळात खर्चात काटकसर गरजेची असताना नव्या कार खरेदीची हौस असलेल्या महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ‘जनाची नाही, तर मनाची लाज तरी बाळगून’ कार खरेदीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. महापौर नरेश म्हस्के यांना १९ लाख ६७ हजार रुपयांची ह्युंदाई एलंत्रा, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृहनेते अशोक वैती, स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांना प्रत्येकी दहा लाख ९३ हजारांची होंडा सिटी, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीचे सभापती भूषण भोईर, वर्तकनगर प्रभाग समितीच्या सभापती राधिका फाटक आणि महिला-बालकल्याण समितीच्या सभापती राधाबाई जाधव यांना स्विफ्ट डिझायर दिली जाणार आहे. त्याची एकत्रित किंमत १८ लाख ४५ हजार रुपये आहे. एकिकडे महापालिकेच्या अर्थसंकल्पात तब्बल १२०० कोटी रुपयांची घट झाली आहे. नगरसेवकांचा निधी, दिव्यांग आणि विधवा महिलांना अनुदान आदीच्या खर्चात कपात झाली. अशा परिस्थितीत ठाणेकर जनता अडचणीत असताना, महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांना ७० लाख रुपयांच्या गाड्या खरेदीचा हट्ट का? यापूर्वीची वाहने केवळ तीन ते चार वर्षांपूर्वीच खरेदी केली आहेत आणि तीही सुस्थितीत असताना नव्या गाड्यांची हौस का? असा प्रश्न संजय वाघुले यांनी उपस्थित केला आहे. अशाच प्रकारची मागणी महिला मोर्चाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading