संजय वाघुले यांच्या यांच्या कार्यालयाची दोघा अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड

भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्या रेल्वे स्टेशननजीकच्या कार्यालयाची दोघा अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. हातात काठ्या घेऊन आलेल्या दोघा गुंडांनी दरवाजाच्या काचा फोडल्या. त्यानंतर ते पळून गेले. या हल्ल्याच्या वेळी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले हे महापालिकेत होते. तर कार्यालयात कर्मचारी होते. सुदैवाने, त्यातील कोणालाही दुखापत झाली नाही. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अद्यापि कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading