आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार किरिट सोमैय्या यांच्यातील वाद सुरूच

आमदार प्रताप सरनाईक आणि माजी खासदार किरिट सोमैय्या यांच्यातील वाद प्रतिवाद सुरूच असून आता दोघांनी एकमेकांविरोधात पोलीसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. व्होल्टास कंपनीमध्ये उभारल्या जात असलेल्या कोविड सेंटरवरून संजय वाघुले आणि किरिट सोमैय्या यांनी आरोप केल्यानंतर यामागे भ्रष्टाचार झाला नाही ना असा आरोप करत पोलीस चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सरनाईक यांनी केली आहे. या दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त व्होल्टास कंपनीतील नियोजित कोविड सेंटरवर टीका केली. मात्र त्याचवेळी शेठ ग्रुपच्या कोविड सेंटरबाबत भाष्य केलं नाही. याविषयी सरनाईक यांनी भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत ही तक्रार केली आहे. शेठ ग्रुप बरोबर संजय वाघुले यांची देव कॉर्पोरा इमारतीमध्ये एक चर्चा झाल्याचं क्लोज सर्किट टीव्ही कॅमे-याचं फूटेज आपल्याकडे असून फक्त व्होल्टासच्या जागेवर होत असलेल्या कोविड सेंटरबाबत आक्षेप घेण्यामागे भ्रष्टाचार तर नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे. याप्रकरणी किरिट सोमैय्या आणि नगरसेवक संजय वाघुले यांची चौकशी करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading