आमदार सरनाईकांचे पत्र म्हणजे झोपी गेलेला जागा झाला – मनोहर डुंबरे यांचा टोला

ठाणे शहरातील थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कमधील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा चौकशी अहवाल जाहीर करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची महापौर-आयुक्तांकडे मागणी म्हणजे झोपी गेलेला जागा झाला असा टोला गटनेते मनोहर डुंबरे यांनी मारला आहे.

Read more

महापालिकेतील सत्ताधा-यांकडून कोट्यावधींची उधळण – भारतीय जनता पक्षाची टीका

ठाणे महापालिकेकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. मात्र, त्याचवेळी साडेपाच कोटींची प्रस्तावित रंगमंच दुरुस्ती, १४ कोटींचे पादचारी पूल, पदाधिकाऱ्यांसाठी ७० लाखांची वाहने आदींसाठी सत्ताधाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची बेलगाम उधळपट्टी केली जात आहे, अशी टीका मनोहर डुंबरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Read more

मुंबई-नागपूर प्रमाणेच ठाण्यातही ज्येष्ठ तसंच आजारी असलेल्या नागरिकांना घरी जाऊन लस देण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणिनागपूर महापालिकेच्या धर्तीवर ठाणे शहरात आजारी असलेल्या नागरिकांना घरी जाऊन लस देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Read more

पालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांसह सहायक आयुक्तांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मनोहर डुंबरेंची मागणी

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांसह प्रभाग समितीतील सहायक आयुक्त, त्यांचे निकटचे नातेवाईक यांच्या संपत्तीची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करावी. तसेच शहरात पाच वर्षांत झालेल्या अतिक्रमणासंदर्भात उपायुक्त (अतिक्रमण), सहायक आयुक्त आणि भूमाफिया यांच्या संबंधांची चौकशी करण्यासाठी प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Read more

कॉलसेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या उधळपट्टीला मनोहर डुंबरेंचा तीव्र विरोध

कोरोना हॉस्पिटलमधील बेड मिळविण्यात त्रस्त झालेल्या ठाणेकरांची आता लसीकरणासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र, कोविडचा संसर्ग झाल्यानंतर घरातच थांबलेल्या रुग्णांची केवळ एका फोनवर विचारपूस आणि सल्ला देण्यासाठी ठाणे महापालिका प्रती कॉल १५ रुपये मोजणार आहे. दररोज ६ हजार फोन कॉलचे कंत्राट प्रशासनाने दिले असून कॉलसेंटर कंपनीला ५४ लाख रुपये दिले जाणार आहेत. या कॉलसेंटरसाठी महापालिकेनेच सात लाख रुपये खर्चून चार डॉक्टरांचीही नियुक्ती केली आहे. त्यामुळे कॉलसेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या उधळपट्टीला भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी तीव्र विरोध केला आहे.

Read more

लसीकरण स्लॉट हॅकप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मनोहर डुंबरेंची मागणी

शहरातील लसीकरणाच्या वेळेचे स्लॉट बूक करण्याच्या प्रकारात गैरप्रकाराची शक्यता लक्षात घेऊन या प्रकरणी सायबर पोलिसांकडून चौकशी करावी. तसेच संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

बिल्डर प्रिमियम माफीची रक्कम राज्य सरकारने महापालिकेला द्यावी – मनोहर डुंबरेंची मागणी

बिल्डरांना ५० टक्के प्रिमियम माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे ठाणे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडणार आहे. कोरोना आपत्तीच्या काळात महापालिकेचे उत्पन्न तब्बल १२०० कोटी रुपयांनी कमी झाल्यामुळे नागरी सुविधा पुरविण्यावर मर्यादा येणार आहेत. तरी बिल्डरांच्या माफीची रक्कम राज्य सरकारने महापालिकेला परत करावी अशी मागणी गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Read more

व्यापाऱ्यांवर सक्ती नको, संघटनांशी चर्चा करावी – मनोहर डुंबरेंचं आवाहन

राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांच्या वेळा सहायक आयुक्तांकडून निश्चित केल्या जाणार आहेत. मात्र, त्यात व्यापाऱ्यांवर सक्ती न करता स्थानिक व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

खासगी हॉस्पिटलना ऑक्सीजन साठा पुरवावा- मनोहर डुंबरे यांची मागणी

कोरोना आपत्तीच्या काळात ऑक्सिजन साठा मिळविण्यात ठाण्यातील खासगी हॉस्पिटल प्रशासन हतबल झाले आहे. या प्रश्नात तातडीने महापालिकेने लक्ष घालून खासगी हॉस्पिटलला साठा पुरवावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

झुंडीने एकत्र आलेल्या शिवसेनेच्या ६ नगरसेवकांसह ४० शिवसैनिकांवर गुन्हा

भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांना घेराव घालून प्रसिद्धी मिळविण्याचे आंदोलन शिवसेना नगरसेवक-नगरसेविकांच्या अंगलट आले आहे. पोलिसांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून झूंडीने आलेल्या शिवसेनेच्या ६ नगरसेवक-नगरसेविकांसह ३० ते ४० शिवसेना कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read more