खासगी हॉस्पिटलना ऑक्सीजन साठा पुरवावा- मनोहर डुंबरे यांची मागणी

कोरोना आपत्तीच्या काळात ऑक्सिजन साठा मिळविण्यात ठाण्यातील खासगी हॉस्पिटल प्रशासन हतबल झाले आहे. या प्रश्नात तातडीने महापालिकेने लक्ष घालून खासगी हॉस्पिटलला साठा पुरवावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. पार्किंग प्लाझामधील ऑक्सिजन साठा संपुष्टात आल्यामुळे रुग्ण हलविण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमधील साठा संपत आला आहे. काल दुपारपासून खासगी हॉस्पिटलमधील व्यवस्थापन महापालिका आणि सरकारी यंत्रणांकडे ऑक्सिजनसाठी धावपळ करीत होते. मात्र, त्याची दखल घेण्यात येत नव्हती. त्यामुळे खासगी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली अशी माहिती डुंबरे यांनी दिली. त्याचबरोबर या प्रश्नावर तातडीने महापालिका प्रशासनाने हस्तक्षेप करून खासगी हॉस्पिटलला तातडीने गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. भिवंडी शहरातील एका हॉस्पिटलमधील ऑक्सिजन साठा संपुष्टात येणार असल्यामुळे १६ रुग्णांना हलविण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील हॉस्पिटलवरील आपत्ती टाळण्यासाठी तातडीने महापालिका प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading