सिंधी समाजाविरोधातील कथित उद्गारामुळे जितेंद्र आव्हाड अडचणीत

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात सिंधी समाजाला ‘कुत्रा’ संबोधल्याने सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे.

Read more

मुख्यमंत्र्यांना मला संपवण्यासाठी इतकी करामत करावी लागत आहे, त्यामुळे मी खुश आहे- जितेंद्र आव्हाड

गरिबांना घरं द्यायच्या निर्णयामुळे फडणवीसांचे अभिनंदन करतो असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. आम्ही एक निर्णय घेतला होता की एल. वाय मिळाल्यानंतर अडीज वर्षांनी त्यांना ते घर विकता आले पाहिजे, तो निर्णय त्यांनी घ्यावा कारण झोपडपट्टीला एल. वाय दिल्यानंतर कधी विकसित होईल याचे काही वय वर्ष नसतं त्यामुळे गरीब माणसाला झोपडी ही आजारात कामी येते, लग्नात कामी येते, झोपडी हे त्याचं धन आहे, जर एल.वाय दिला आणि तिथे बिल्डिंग बनायला जर तीस वर्षे लागत असतील तर त्याची तीस वर्षे वाया जातात त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की त्यांनी हा निर्णय घ्यावा.

Read more

देशाची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे – जितेंद्र आव्हाड

देशात अराजकता माजवण्याचा आणि देशाला बदनाम करणाऱ्या ‘केरळ स्टोरी’ या सिनेमाच्या निर्मात्याला फाशी दिली पाहिजे हे आपले विधान संतापाचा कडेलोट होता. आपणाकडून व्यक्त झालेला शाब्दिक संताप होता. देशात धार्मिक विद्वेष पसरविणार्‍यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे आपले मत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केले.

Read more

लोकांची जी इच्छा आहे ती शरद पवारांनी पूर्ण करावी – जितेंद्र आव्हाड

शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे. शरद पवार हे सक्रीय राजकारणातून बाजूला होणे म्हणजे महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे. सध्या राज्य संस्कृतीहीन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक, आर्थिक, उद्योग, राजकीय या सर्वच क्षेत्रात नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली.

Read more

कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्रप्रदर्शनाचे आयोजन

कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्रप्रदर्शनाचे आयोजन राज राजापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. धनुष्यबाण न घेता भाऊ, पत्नी, भक्त आणि अनुयायांच्या सान्निध्यात रममाण झालेल्या श्री रामाची विविध रूपे या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना पाहता आली. या चित्रप्रदर्शनाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्वीट करणाऱ्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्वीट करणाऱ्या व्यक्ती विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

एसआयटीने बसवलेला खरा व्हिडिओ तुम्ही खोटा दाखवला- जितेंद्र आव्हाड

आमची जी मागणी आहे,तीच मागणी समस्त राजकीय पक्षांची मागणी आहे. न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्यात येईल. तुमचे डिझास्टर मॅनेजमेंट काय करत होते. त्याजागी सीसीटीव्ही कॅमेरे होते की नव्हते, पोलिसांनी तुम्हाला काय सूचना दिल्या होत्या या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील. आणि तुम्ही कुणाचे धंदे किती केले तरी पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये ते आलेच नाही की त्यांचा फोटो चांगला आहे म्हणून एसआयटीने बसवलेला खरा असलेला व्हिडिओ तुम्ही खोटा दाखवायला सुरुवात केलीत. इथे खरे व्हिडिओ समोर आले आहेत अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Read more

कोकण मर्कंटाईल बँकेच्या अध्यक्षपदी सलग दुसर्‍यांदा नजीब मुल्ला बिनविरोध

कोकण मर्कंटाईल मल्टी स्टेट को. ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन नजीब मुल्ला यांच्या कुशल नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करीत सलग दुसर्‍यांदा पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली आहे.

Read more

संताचा चेहरा वापरून आपली राजकीय गणितं जोडण्याचा हा कार्यक्रम आहे – जितेंद्र आव्हाड

संताचा चेहरा वापरून आपली राजकीय गणितं जोडण्याचा हा कार्यक्रम आहे अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील घटनेविषयी बोलताना त्यांनी ही टीका केली.

Read more

महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयावर जनप्रक्षोभ मोर्चा

रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने काल पोलीस आयुक्त कार्यालयावर जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता.

Read more