कोकण मर्कंटाईल बँकेच्या अध्यक्षपदी सलग दुसर्‍यांदा नजीब मुल्ला बिनविरोध

कोकण मर्कंटाईल मल्टी स्टेट को. ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन नजीब मुल्ला यांच्या कुशल नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करीत सलग दुसर्‍यांदा पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली आहे. महाराष्ट्रासह गोवा, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यात विस्तारलेल्या सुमारे 54 हजार सभासद असलेल्या कोकण बँकेच्या 53 वर्षाच्या कालखंडात निवडणुकीची प्रथा मोडीत काढून सलग दोन वेळा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सुमारे दोन हजार कोटी ची आर्थिक उलाढाल असलेल्या कोकण बँकेला विद्यमान चेअरमन नजीब मुल्ला यांनी गेली पंधरा वर्षात बँकेला प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे. युवा संचालकांना एकत्र घेऊन बँकेची घोडदौड पाहता सभासदांनी सलग दोन वेळा विश्वास व्यक्त करून निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडली आहे.
समाजातील सर्वच घटकांना आणि सभासदांना विश्वासात घेऊन सोबत सन 2023- 28 या कालावधी करिता नव्याने निवडून आलेले संचालक मंडळ – नजीब मुल्ला ,आसिफ दादन, डॉ. शाहिद बरमारे,असगर डबीर,दिलीप मुजावर,बशीर मुर्तुझा, अल्ताफ काझी, ड. तसनीम काझी, फरीदा काझी, ड. मकबूल सुर्वे, डॉ. साजिद अधिकारी, फरहान वलाले ,मिलिंद कडलक, मोहम्मद नावेद रोगे, रिझर्व बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर अब्दुल रशीद शेख, समीर मुल्ला हे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading