जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्वीट करणाऱ्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्वीट करणाऱ्या व्यक्ती विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय नावाच्या एका ट्वीटर हँडलवरून जितेंद्र आव्हाड यांना अश्लील शिविगाळ करणारी पोस्ट शेअर करण्यात आली होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे उथळसर ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे आणि सोशल मीडियाचे प्रमुख जतीन कोठारी यांनी राबोडी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास राबोडी पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading