पुण्याच्या घटनेतील तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरूणांचा जितेंद्र आव्हाडांनी केला सत्कार

पुण्यात माथेफिरूच्या हल्ल्यातून तरूणीला वाचविणारे लेशपाल जवळगे, हर्षद शिंदे आणि दिनेश मढवी यांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आव्हाड यांच्या घरी सत्कार करण्यात आला.

Read more

मुख्यमंत्र्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत – आनंद परांजपे यांचा सल्ला

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात स्वत:वर गोळी झाडून घेण्याचे विचार यावेत; हे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने चांगले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला.

Read more

ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जागतिक गद्दार दिन साजरा करत जोरदार निषेधात्मक आंदोलन

ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जागतिक गद्दार दिन पाळण्यात आला. या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केलं.

Read more

सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली संरक्षणाची गरज नसणाऱ्यांना पोलीस संरक्षण पुरवतात – आनंद परांजपे यांचा आरोप

ज्यांना धमकी आलेली आहे किंवा नाही, याची शहानिशा न करताच ठाणे पोलीस आयुक्तालयाने शेकडो जणांना पोलीस संरक्षण पुरविले आहे. जे पुढारी लोकप्रतिनिधीच्या कोणत्याही परिभाषेत समाविष्ट होत नाहीत. जे नोकर सत्ताधाऱ्यांच्या घरातील भाजी आणण्याचे काम करीत आहेत, त्या आणि सत्ताधाऱ्यांच्या सहाय्यकांसह ज्यांना संरक्षणाची गरज नाही अशा लोकांना पोलीस संरक्षण पुरवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या अंगरक्षकांना फुलांचे गुच्छ पकडण्यास लावत आहेत. तसेच त्यांना चक्क मिठाई आणण्यासाठी दुकानात पाठवले जात आहे. अशा पद्धतीने हे सत्ताधारी ठाणे पोलिसांचा अपमान करीत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोफत दाखले वाटप शिबिरात रेकॉर्ड ब्रेक अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत दाखले वाटप शिबिरात रेकॉर्ड ब्रेक अर्ज आले.

Read more

सत्य बाहेर न आणल्यास 1 जुलैला मुंब्रा बंदचा जितेंद्र आव्हाडांचा इशारा

गाझीयाबाद येथील एका पोलीस अधिकाऱयाने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. मात्र, विकसीत होत असलेल्या मुंब्य्राला बदनाम करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सत्य जाहीर करावे. अन्यथा येत्या 1 जुलैला मुंब्रा बंद करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

Read more

धर्मवीर आनंद दिघे हे त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे मूर्तीमंत उदाहरण – आनंद परांजपे

धर्मवीर आनंद दिघे हे त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे मूर्तीमंत उदाहरण होते. त्यांचे नाव घेण्याचा नैतीक अधिकार शिंदे गटाला नाही. धर्मवीर आनंद दिघे यांचे सर्वस्व हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते. तर, शिंदे गटाचे सर्वस्व हे सत्ता हेच आहे. एका बाजूला आनंद दिघे असतानाच दुसऱया बाजूला राक्षसी महत्वकांक्षा, सत्तेची लालसा आणि गद्दारी याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे नरेश म्हस्के यांना आपण थेट सवाल करीत आहोत की, धर्मकार्य करताना जे नैतीक अधिष्ठान अंगी असावे लागते, ते आनंद दिघे यांचे नाव घेणाऱ्यांचे नरेश म्हस्के यांच्या अंगी आहे का?

Read more

पैशांच्या हव्यासातून क्लस्टर योजना अंमलात आणल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड

पैशांच्या हव्यासातून क्लस्टर योजना अंमलात आणल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Read more

जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ माॅर्फ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

ठाण्यातील सिंधी बांधवांमध्ये मॉर्फ केलेला व्हिडिओ प्रसारीत करून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

Read more

मुंब्र्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी रॅली

मुंब्रा शहरात काही समाजकंटकांच्या मार्फत अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत आहे. त्याविरोधात सुलताना वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून “अंमली पदार्थ विरोधी” रॅली काढण्यात आली.

Read more