राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोफत दाखले वाटप शिबिरात रेकॉर्ड ब्रेक अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत दाखले वाटप शिबिरात रेकॉर्ड ब्रेक अर्ज आले. या शिबिरात दाखला मिळविण्यासाठी सुमारे 2 हजार 393 जणांनी आपले अर्ज दाखल केले. या शिबिरामध्ये रहिवास दाखला,अधिवास दाखला (डोमेसाईल), ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न दाखले यांचे मोफत वाटप करण्यात आले. या शिबिराचा सुमारे 2 हजार 393 जणांनी लाभ घेतला. कागदपत्रांची तपासणी करुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दाखले देण्यात येणार आहेत. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या शिबिराला प्रतिसाद दिला. दाखल्यांसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तहसीलदार कार्यालयातून दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना अनेकदा द्राविडी प्राणायाम करावे लागतात. आता शाळा – काॅलेज सुरू होणार असल्याने वेळेवर दाखले मिळणे आवश्यक असते. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त हे मोफत दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading