मुंब्र्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी रॅली

मुंब्रा शहरात काही समाजकंटकांच्या मार्फत अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत आहे. त्याविरोधात सुलताना वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून “अंमली पदार्थ विरोधी” रॅली काढण्यात आली. यावेळी अनेक तरूण-तरूणींनी मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा, कौसा भागात अंमली पदार्थ विरोधी मोहीम आखण्याचा निर्धार व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा, भागात अंमली पदार्थांची खरेदी विक्री वाढली आहे. मर्जिया पठाण यांनी मुंब्र्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने ही रॅली काढली. अमृत नगर ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मुंब्रा पोलीस ठाणे अशी ही रॅली काढण्यात आली होती. तरूणांनी हातात अंमली पदार्थ सेवन करणार नाही, करू देणार नाही; नशेखोरी बंद करो, ” असा संदेश देणारे फलक घेतले होते. यावेळेस मर्जिया पठाण म्हणाल्या की, अंमली पदार्थांची विक्री करणा-या समाजकंटकांना ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे. तसेच, ज्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. त्या दुकानांवर कारवाई करण्यात यावी. यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे. पण, पालकांनीही आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. यावेळी मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन देऊन अंमलीपदार्थ मुक्त मुंब्रा करण्याची विनंती केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading