पैशांच्या हव्यासातून क्लस्टर योजना अंमलात आणल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड

पैशांच्या हव्यासातून क्लस्टर योजना अंमलात आणल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. क्लस्टर मधून अब्जावधी रुपये मिळतील आणि पुढच्या 10 पिढ्या बसून खातील या हव्यासापोटी क्लस्टर योजना राबविल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी क्लस्टर वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पैशांच्या हव्यासापोटी या प्रकारची क्लस्टर योजना अंमलात आणली आहे. जी पुढील 50 वर्षे पूर्ण होऊ शकत नाही, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवत त्यांना टोमणाही मारला. काल मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या भाषणात आपण विधानसभेच्या गच्चीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धमकी दिल्यानंतर ठाण्यातील क्लस्टर ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चालना दिल्याचे म्हंटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाडांनी मी जेव्हापासून राजकारणामध्ये आहे. तेव्हापासून त्यांनी कुठून उडी मारेन असे बोलल्याचे आठवत नसून त्यांनी सांगावे ते कुठे बोलले अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading