ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या ‘सोसायटी स्पेशलिस्ट समीट’मध्ये सोसायटी व्यवस्थापनाचे धडे

ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि बीएनआय संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सोसायटी स्पेशलिस्ट समिट या मार्गदर्शनपर संवाद कार्यक्रमात गृहनिर्माण सोसायट्यांच्या सदस्यांना सोसायटी व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.

Read more

समता संस्कार शिबिराला एकलव्यांचा उत्साही प्रतिसाद

दर वर्षी प्रमाणे या वर्षीही समता विचार प्रसारक संस्थेतर्फे एकलव्य विद्यार्थ्यांसाठी येऊर येथील अनंताश्रम येथे ५ दिवसांच्या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

रोटरी आणि डिग्नीटी फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांनी फिजिओथेरेपी सुविधेचा घेतला लाभ

रोटरी ,डिग्नीटी फाऊंडेशन आणि दिलीप बारटक्के जन्मदिन सोहळा समितीच्या वतीने स्थानिक ओमकार जेष्ठ नागरिक संस्था ,चैतन्य जेष्ठ नागरिक संघ आणि शिवशक्ती नागरिक संघ  मधील जेष्ठ नागरिकांसाठी  संधीवात, गुडघेदुखी, मानदुखी, टाच दुखी, कोपरा दुखी, अर्धांग वायू,पाठ दुखी , कंबर दुखी*,खांदा दुखी यावर फिजिओथेरेपी व्हॅन फिरता दवाखाना मध्ये सुविधा देण्यात आली.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाचा १८ एप्रिल रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा

प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा १८ एप्रिलला काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

Read more

डोंबिवलीत सहकार मार्गदर्शन मेळावा

दि ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑप. हाऊसिंग फेडरेशन लि. आणि हाऊसिंग प्लस,डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ यावेळेत सर्वेश मंगल कार्यालय, दुसरा मजला, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) येथे सहकार मार्गदर्शन मेळावा होत आहे.

Read more

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिम्मित शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपा ओबीसी मोर्चा,ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.  
समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यात मोलाची कामगिरी करणारे, स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत, समाजसेवी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खोपट येथील भाजपा ठाणे शहर जिल्हा कार्यालयात आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ओबीसी मोर्चा,ठाणे शहर जिल्हा तर्फे अध्यक्ष सचिन केदारी यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे,भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले, ओबीसी महिला संयोजक वनिता लोंढे,माजी गटनेते मनोहर डुंबरे,माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी,भाजपा ओबीसी मोर्चा,ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सचिन केदारी,महिला अध्यक्षा नयना भोईर,कैलास म्हात्रे,मनोहर सुगदरे, आदीसह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या सुमारे २७  सत्कारमूर्तीं चा सन्मान करण्यात आला.
 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस बाबुराव रामण्णा, सचिव महेश सुभाष सपकाळे, उपाध्यक्ष नागेश भोसले, नरेश ठाकुर, सुनील बांगर, बळीराम भोडोकार, अविनाश गावंडे , महिला सरचिटणीस श्रृतिका कोळी मोरेकर ,कल्याणी सुर्वे,कल्याणी वाघमारे,हर्षला म्हात्रे,चित्रा मिरवणकर,रेणुका निकम,रायला देवी मंडळ  वरून कारंजे,लाभेश धसाडे,रायला देवी मंडळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र भऊर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव श्री महेश सुभाष सपकाळे यांनी केले.

Read more

कुटुंबातील प्रत्येकाला संधी दिली तर सर्वांच्या विकासाचा मार्ग मोकळा – अॅड. संजय बोरकर

कुटुंबातील प्रत्येकाकडे काही ना काही गुण असतात. त्या गुणांना ओळखून त्यानुसार त्या त्या व्यक्तीला संधी दिली तर कुटुंबातील सर्वांच्या विकासाचा मार्ग मोकळा होतो, असा महत्वाचा संदेश ठाण्यातील सुप्रसिद्ध वकील ॲड. संजय बोरकर यांनी ठाण्यात दिला.

Read more

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे उपक्रमात सहकार्य करणा-यांचा सत्कार

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्थेतर्फे एकलव्य विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचा समता कुटुंब मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Read more

सहा हजार पीडी मिटर थकबाकीदाराना टोरंट पॉवरतर्फे आली दुसरी नोटीस

कळवा-मुंब्रा-दिवा येथील वीज ग्राहकांमध्ये ज्यांची महावितरण पीडी मिटर  (PD meter) वीज बिलाची थकबाकी शिल्लक असूनही त्याचा भरणा केला नाही, अश्या सुमारे सहा हजार ग्राहकाना थकबाकीबाबत दुसरी नोटीस टोरंट पॉवर कंपनीने जारी केली आहे.

Read more

ठाणे जिल्ह्यांतील ग्रामीण भागात पहिल्यांदा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार

दिवसेंदिवस प्लॅस्टिक वापर वाढत आहे. शहरी भागात तसेच ग्रामीण भागात देखील प्लॅस्टिक वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.‌ प्लॅस्टिक व्यवस्थापन आव्हान म्हणून समोर उभे राहिले असताना जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत प्लास्टिक व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेऊन कामास सुरुवात केली आहे. गावातील रस्त्याच्या कडेला व महामार्गावर प्लॅस्टिक सारख्या घातक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी भिवंडी, अंबरनाथ, शहापूर येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.‌

Read more