डोंबिवलीत सहकार मार्गदर्शन मेळावा

दि ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑप. हाऊसिंग फेडरेशन लि. आणि हाऊसिंग प्लस,डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ यावेळेत सर्वेश मंगल कार्यालय, दुसरा मजला, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) येथे सहकार मार्गदर्शन मेळावा होत आहे.

हा कार्यक्रम विनामुल्य आहे. या मेळाव्यात सहकारी गृहनिर्माण संस्थामधील समस्या, त्या अनुषंगाने असलेल्या कायद्यातील तरतुदी यासोबतच तंटामुक्ती अभियान आणि समिती, मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स), पुनर्विकास व स्वयं पुनर्विकास, गृहनिर्माण संस्था व त्यांचे व्यवस्थापन आणि १५४ – बी २९ (१०१) अंतर्गत थकबाकी वसुली प्रक्रिया यावर हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आणि उपनिबंधक दिनेश चंदेल मार्गदर्शन करतील.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील.अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनकडुन देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading