महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिम्मित शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपा ओबीसी मोर्चा,ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.  
समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यात मोलाची कामगिरी करणारे, स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत, समाजसेवी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खोपट येथील भाजपा ठाणे शहर जिल्हा कार्यालयात आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ओबीसी मोर्चा,ठाणे शहर जिल्हा तर्फे अध्यक्ष सचिन केदारी यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे,भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले, ओबीसी महिला संयोजक वनिता लोंढे,माजी गटनेते मनोहर डुंबरे,माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी,भाजपा ओबीसी मोर्चा,ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सचिन केदारी,महिला अध्यक्षा नयना भोईर,कैलास म्हात्रे,मनोहर सुगदरे, आदीसह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या सुमारे २७  सत्कारमूर्तीं चा सन्मान करण्यात आला.
 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस बाबुराव रामण्णा, सचिव महेश सुभाष सपकाळे, उपाध्यक्ष नागेश भोसले, नरेश ठाकुर, सुनील बांगर, बळीराम भोडोकार, अविनाश गावंडे , महिला सरचिटणीस श्रृतिका कोळी मोरेकर ,कल्याणी सुर्वे,कल्याणी वाघमारे,हर्षला म्हात्रे,चित्रा मिरवणकर,रेणुका निकम,रायला देवी मंडळ  वरून कारंजे,लाभेश धसाडे,रायला देवी मंडळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र भऊर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव श्री महेश सुभाष सपकाळे यांनी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading