सहा हजार पीडी मिटर थकबाकीदाराना टोरंट पॉवरतर्फे आली दुसरी नोटीस

कळवा-मुंब्रा-दिवा येथील वीज ग्राहकांमध्ये ज्यांची महावितरण पीडी मिटर  (PD meter) वीज बिलाची थकबाकी शिल्लक असूनही त्याचा भरणा केला नाही, अश्या सुमारे सहा हजार ग्राहकाना थकबाकीबाबत दुसरी नोटीस टोरंट पॉवर कंपनीने जारी केली आहे.

ज्या ग्राहकांचे मीटर पीडी ( कायमस्वरूपी बंद) झाले असतील किंवा त्या बिलाबाबत- थकबाकीबाबत काही शंका, वाद असेल तर अश्या  ग्राहकानी कल्याण-शीळ रस्त्यावरील अरिहंत बिल्डींगमधील टोरंट पॉवरच्या कार्यालयात सोमवार-मंगळवारी संपर्क साधावा. महावितरणचे अधिकारी खास पीडी मिटर थकबाकी बाबत अरिहंत कार्यालयात सोमवार  व मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ वेळेत उपस्थित राहून ग्राहकाना भेटणार आहेत. ग्राहकांनी त्यांची कागदपत्रे घेऊन सदर अधिकारयाना भेटून त्यांच्या तक्रारीचे निरसन करून घ्यावे असे आवाहन टोरंट पॉवर कंपनीने केले आहे.

कळवा-मुंब्रा-शीळ दिवा क्षेत्रात तीन लाखावर वीज ग्राहक असून वीज मीटर असलेले ९० टक्केहून अधिक ग्राहक नियमित वीज बिलाचा भरणा करीत आहेत. त्यात सहा हजारावर पीडी मीटर थकबाकीदार असे आहेत की, ज्यांच्याकडे मीटर नाही आणि त्यानी अनेक महिन्यांपासून थकीत वीज बिलाचा भरणा केलेला नाही. अश्या ग्राहकानी  ग्राहक कक्षाशी संपर्क साधून पीडीची थकबाकी भरणे व मीटर जोडणी कायदेशीररित्या करून घ्यावी असे आवाहन टोरंट पॉवर कंपनीने केले आहे. सध्या थकबाकी न भरलेल्या ग्राहकाना कंपनीने दुसरी नोटीस पाठवली असून तीन महिन्यात तीन नोटीस दिल्यानंतरही ग्राहकानी प्रतिसाद दिला नाही, तर त्यांच्यावर वीज कायदा अधिनियमनुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ग्राहकानी तिसर्या नोटीसची वाट न पाहता ग्राहक कक्षाशी लवकरात लवकर  संपर्क साधून नवीन मीटरसाठी अर्ज करावा असे आवाहन टोरंट पॉवर कंपनीने केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading