डोंबिवलीत सहकार मार्गदर्शन मेळावा

दि ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑप. हाऊसिंग फेडरेशन लि. आणि हाऊसिंग प्लस,डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ यावेळेत सर्वेश मंगल कार्यालय, दुसरा मजला, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) येथे सहकार मार्गदर्शन मेळावा होत आहे.

Read more

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी सीताराम राणे – तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी आज सीताराम राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सलग तिसऱ्यादा सीताराम राणे यांनी फेडरेशनचा हा गड राखल्याने आ. संजय केळकर यांनी राणे आणि त्यांच्या सहकार्याचे अभिनंदन केले.
ठाणे हौसिंग फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक ८ जानेवारी रोजी पार पडली. यामध्ये विरोधी पॅनलचा धुव्वा उडवत सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली समर्थ सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व २१ संचालक भरघोस मताधिक्याने निवडून आले.सलग तिसऱ्यादा सीताराम राणे यांच्या पॅनेलने फेडरेशनवर वर्चस्व राखले.आज निवडून आलेल्या संचालकांमधून सीताराम राणे यांची सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. त्यांच्यासह निंबा पाटील यांची उपाध्यक्षपदी तर ज्ञानू चोरगे यांची मानद सचिवपदी , डॉ. राजाराम दळवी यांची सहसचिवपदी आणि  कोषाध्यक्ष म्हणून हिंदुराव गळवे याची बिनविरोध निवड झाली.
     मंगळवारी ठाणे स्टेशन नजीकच्या हौसिंग फेडरेशनच्या कार्यालयात आ. संजय केळकर आणि परिवहन सदस्य विकास पाटील यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारुन सीताराम राणे यांनी कारभार हाती घेतला. यावेळी बोलताना सीताराम राणे यांनी, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी या सगळ्या प्रक्रियेत मनापासून सहकार्य केले.

Read more

सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यातून वगळण्यास हौसिंग फेडरेशनचा विरोध

महाविकास आघाडी सरकारने सहकारी गृहनिर्माण संस्थाना सहकार कायदयातुन वगळण्याचा डाव आखला आहे.एकीकडे ‘विना सहकार नाही उद्धार’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे सहकारालाच मुठमाती द्यायची हा प्रकार म्हणजे घटनात्मक अधिकाराची पायमल्ली आहे.असा आरोप महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केला आहे.

Read more

गृहनिर्माण संस्थांकडून कर वसुली करण्याचा ठाणे महापालिकेचा प्रस्ताव मंजूर न करण्याची मागणी

ठाणे महापालिकेने २० जानेवारीला होणा-या सर्वसाधारण सभेपुढे गृहनिर्माण संस्थांकडून १० लाख रक्कम मालमत्ता कराबरोबर वसुली करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. महापालिकेच्या हद्दीतील गृहनिर्माण संकुलांमध्ये मलप्रक्रिया केंद्रातील टाकी साफ करताना खाजगी ठेकेदाराच्या कामगाराचा मृत्यु झाल्यास, महापालिकेच्या वतीने तातडीने १० लाख भरपाई देण्यात येणार आहे. मात्र पालिकेने दिलेली भरपाई ही त्या गृहनिर्माण संस्थेकडून मालमत्ता कराबरोबर वसुली केली जाणार आहे.

Read more

गृहनिर्माण संस्थांना दंड, व्याज माफ करण्यासह राखीव निधी वापरण्यास परवानगी देण्याची फेडरेशनची मागणी

गृहनिर्माण संस्थांना दंड, व्याज माफ करण्यासह राखीव निधी वापरण्यास परवानगी देण्याची मागणी गृहनिर्माण संस्था फेडरेशननं केली आहे.

Read more

आंबा आपल्या दारी या चळवळीला ग्रामधोरणामुळे खीळ बसण्याची चिन्हं

रेड झोनमध्ये आंबा वाहतुक करून परतणाऱ्यांना कोकणात क्वारंटाईन केलं जात असल्यानं आंबा आपल्या दारी या चळवळीला ग्रामधोरणामुळे खीळ बसण्याची चिन्हं दिसत आहेत.

Read more

गृहनिर्माण संस्थांच्या मेळाव्याचं येत्या रविवारी आयोजन

आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं गृहनिर्माण संस्थांच्या मेळाव्याचं येत्या रविवारी आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीनं ठाण्यात प्रथमच अग्निहोत्राचं आयोजन

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीनं ठाण्यात प्रथमच पर्यावरण पूरक अशा सामुहिक अग्निहोत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more