रोटरी आणि डिग्नीटी फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांनी फिजिओथेरेपी सुविधेचा घेतला लाभ

रोटरी ,डिग्नीटी फाऊंडेशन आणि दिलीप बारटक्के जन्मदिन सोहळा समितीच्या वतीने स्थानिक ओमकार जेष्ठ नागरिक संस्था ,चैतन्य जेष्ठ नागरिक संघ आणि शिवशक्ती नागरिक संघ  मधील जेष्ठ नागरिकांसाठी  संधीवात, गुडघेदुखी, मानदुखी, टाच दुखी, कोपरा दुखी, अर्धांग वायू,पाठ दुखी , कंबर दुखी*,खांदा दुखी यावर फिजिओथेरेपी व्हॅन फिरता दवाखाना मध्ये सुविधा देण्यात आली. फिजिओथेरपीस्ट डॉ विशाल गुप्ता, डॉ चित्रा जोशी  यांनी आधुनिक तंत्रज्ञान आय.एफ.टी. मशीन, अल्ट्रा साऊंड मशीन, टेन्स मशीन,ट्रॅक्शन मशीन, मसल स्टीमुलेटर, तंत्रज्ञान वापरून  ट्रीटमेंट एक्सरसाईज थेरेपी  , बॅलन्स ट्रेनिंग, फ्रैक्चर नंतरचे व्यायाम,श्वासोच्छवासाचा व्यायाम,ड्राय नीडलिंग थेरपी देवून उपचार करून मार्गदर्शन केले यावेळी फिजिओथेरेपी व्यायाम पुस्तिका देण्यात आली.  बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांनी मोफत फिजिओथेरेपी सुविधाचा लाभ घेतला.
यावेळी दिलीप बारटक्के यांनी म्हटले कि ज्येष्ठ नागरिकांना फिजिओथेरपीची गरज आहे, फिजिओथेरपी व्यायाम तुमच्या शरीराला मजबूत आणि अधिक लवचीक बनण्यास मदत करते. जसे वय वाढत जाते तसे वृद्धांमध्ये शारीरिक बदल घडत असतात. शरीरातील हाडे आणि स्नायूची झीज होत असते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि स्नायूची ताकत कमी होते, शरीराचं संतुलन बिघडते .अलीकडे सर्वांना ,जेष्ठ नागरिकांना आरोग्य फिट ठेवण्याची गरज असूनही दैनंदिन आयुष्यातील आर्थिक अव्यवस्थेमुळे , वाहन सुविधा नसल्यामुळे  आरोग्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळेच इच्छा असूनही काही ज्येष्ठ  नागरीकांची पावले  हॉस्पिटलकडे वळत नाहीत. ज्येष्ठांसाठी हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी  हल्ली लोकांकडे  फारसा वेळच नाही. ज्येष्ठांची  ही समस्या रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊनच्या लक्षात आली. रोटरी क्लब ऑफ ठाणे  अपटाउन  व डिग्निटी फाउंडेशनच्या सहकार्याने “मोफत फिजिओथेरपी व्हॅन ज्येष्ठ नागरिकांच्या घरोघरी” या उपक्रमाने ती समस्याही सोडवून आरोग्याची सेवा सर्वदूर नेण्यासाठी  हातभार लावला आहे .

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading