विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात ७३वा वर्धापन दिन साजरा

विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात काल ७३वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

Read more

पंडीत किंवा उस्तादांनी नव्हे, तर संस्कारानी घडवले – पुरुषोत्तम बेर्डे

कुणा पंडीत किंवा उस्तादजींकडे शिकलो नाही, तर मुंबईतील गलिच्छ व संवेदनशील गणल्या जाणाऱ्या कामाठीपुर्‍यातील संस्कारांनीच मला घडवले. अशी स्पष्टोक्ती सिनेनाटय सृष्टीतील बहुढंगी व्यक्तीमत्व असलेल्या पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिली. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचा समारोप बेर्डे यांच्या आख्यानाने झाला.त्यावेळी त्यांनी आपला कलाप्रवास रसिकश्रोत्यांसमोर उलगडला.

Read more

स्त्री समानतेचा विषय हा चर्चेचा नसून कृतीचा – निलम गो-हे

स्त्रियांनी राजकारणात आपले नेतृत्व सिद्ध करत असताना स्वतःचा कृती आराखडा तयार करावा. स्त्री समानतेचा विषय हा चर्चेचा नसून कृती करण्याचा आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी स्त्रियांवर अन्याय होतो त्या ठिकाणी त्यांच्या मागे ठामपणे उभे रहावे. स्त्रियांच्या न्यायाचे दूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केले.

Read more

सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी घरात सायबर संस्कृती जोपासण्याचा प्रशांत माळींचा सल्ला

सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याकरिता आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात सायबर सेफ संस्कृती जपावी लागेल असा सल्ला सायबर तज्ज्ञ  प्रशांत माळी यांनी दिला.

Read more

जगाचे संविधान बनवण्याची वेळ आली तर ज्ञानेश्वरांचं पसायदान पुरेसं – सुनिल देवधर

जगाचे संविधान बनवण्याची वेळ आली तर कमिटी स्थापन करण्याची गरज नाही. संत ज्ञानेश्वरांचे पसायदानच पुरेसे आहे, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस सुनिल देवधर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांचे हिंदुत्व विश्वव्यापी असल्याचे स्पष्ट केले.

Read more

पत्रकार प्रशांत सिनकर यांना जीवनगौरव पुरस्कार

पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत सिनकर यांना साप्ताहिक ठाणे नवादूत यांनी आयोजित केलेल्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती सन्मान सोहळ्यात पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धन जनजागृती याबाबत केलेल्या कार्याकरीता “जीवन गौरव” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read more

1971 च्या युध्दात सहभागी माजी सैनिकांचा ब्रम्हाळा उद्यानात अनोखा सत्कार

1971 साल हे भारतवर्षाच्या आयुष्यातलं एक ऐतिहासिक वर्ष आहे. ह्याच वर्षी भारताने पाकिस्तानशी झालेल्या युध्दात गौरवशाली विजय मिळवला आणि पाकिस्तानची दोन शकलं केली.

Read more

वंचितांचा रंगमंच हा किंचितांचा न राहता संचितांचा झाला आहे – विजू माने यांचे गौरवोद्गगार

आज वंचितांच्या रंगमंचावर मुले ज्या मुक्तपणे व्यक्त झाली त्या बद्दल रत्नाकर मतकरी सरांनी ज्या द्रष्टेपणाने या रंगमंचाची बीजे रोवली त्याला मनापासून सलाम! आज मला खात्री पटली की हा रंगमंच वंचितांचा पासून किंचितांचा होऊन आता तो संचितांचा झाला आहे. असे कौतुकाचे शब्द सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक विजू माने यांनी आज वंचितांच्या रंगमंचावर सादर झालेला नाट्यजल्लोष बघून काढले. … Read more

ठाण्यातील चर्मकार समाजाचं विविध मागण्यांसाठी महापालिका मुख्यालयासमोर चूल-मूल आंदोलन

ठाण्यातील चर्मकारांनी विविध मागण्या पूर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ ठाणे महापालिका मुख्यालयासमोर चूल-मूल आंदोलन केलं. चर्मकारांच्या स्टॉलवर वारंवार कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं.

Read more

ग्राममंगल आणि आंतरभारतीतर्फे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांचा सत्कार

राज्यातील बहुसंख्य खाजगी शाळा तसेच इंग्रजी शाळा विद्यार्थ्यांना कालबाह्य शिक्षणाचे धडे देत आहेत. याउलट जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांमधून ग्रामीण भागातील लाखो मुलांपर्यंत प्रयोगशील आणि रचनावादी शिक्षण पोहोचले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी ठाण्यात बोलताना केले.

Read more