1971 च्या युध्दात सहभागी माजी सैनिकांचा ब्रम्हाळा उद्यानात अनोखा सत्कार

1971 साल हे भारतवर्षाच्या आयुष्यातलं एक ऐतिहासिक वर्ष आहे. ह्याच वर्षी भारताने पाकिस्तानशी झालेल्या युध्दात गौरवशाली विजय मिळवला आणि पाकिस्तानची दोन शकलं केली. ह्या युध्दाला नुकतीच पन्नास वर्ष पूर्ण झाली. ह्याचंच औचित्य साधून ठाण्यातल्या ब्रम्हाळा उद्यानात येणा-या आणि 1971 च्या युध्दात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या नाना मारणे आणि अनंत गावडे ह्या दोन माजी सैनिकांचा खास सत्कार करण्यात आला. हा सत्कार करण्यासाठी खोपटचे शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र महाडिक आणि सुशील सुर्वे ह्यांनी खास पुढाकार घेतला. ह्या प्रसंगी शुभांगी सरमोकदम ह्यांनी देशभक्तीपर गाण्याच्या ओळी सादर केल्या. राजेंद्र महाडिक ह्यांनी 1971 च्या युध्दाची पार्श्वभूमी विषद केली. संदीप शिंदे ह्यांचंही समयोचित भाषण झालं. देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात आणि ह्या दोन माजी सैनिकांच्या 1971च्या युद्धातल्या सहभागाचं उपस्थित असलेल्या सगळ्यांनी त्यांना जातीने भेटून कौतुक केलं. आमच्या आयुष्याच्या संध्याकाळी आमच्या त्या सहभागाची दखल घेणारा हा सत्कार अनोखा असल्याचं ह्या दोन्ही सत्कारमुर्तींनी बोलून दाखवलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading