ठाणे महापालिकेच्या ”एक हात मदतीचा” उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोकणात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या ”एक हात मदतीचा” या सामाजिक उपक्रमाला ठाणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून जमा झालेली १ गाडी अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत आज चिपळूण येथील नागरिकांना वाटण्यासाठी रवाना करण्यात आली.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये १६ तर कळव्यामध्ये १० नवे रूग्ण

ठाण्यात आज ५० नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये १६ तर कळव्यामध्ये १० नवे रूग्ण सापडले.

भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांच्याविरोधात आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून १०० कोटींचा नुकसान भरपाई दावा न्यायालयात दाखल

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांच्या विरोधात १०० कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा न्यायालयात दाखल केला आहे.

Read more

मुंब्रा बाह्यवळण रस्त्याला मोठं भगदाड

मुंब्रा बाह्यवळण रस्त्याला मोठं भगदाड पडलं आहे. यामुळं या भगदाडाच्या बाजूला बॅरिकेटस् लावून या रस्त्यावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

Read more

बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पत्रकार संघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

ठाणे शहरात बोगस पत्रकारांचा सुळसूळाट झाला असून अनेकांना ते त्रास देत आहेत. या बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल ठाणे जिल्हा पत्रकार संघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना लेखी निवेदन दिले.

Read more

वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा आमदार संजय केळकरांचा इशारा

वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा नियमित न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. गेले काही दिवस ठाण्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने उद्योग-व्यवसाय, ऑनलाईन अभ्यास तसेच वर्क फ्रॉम होम करणा-या नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. एकीकडे ग्राहकांना अवाच्या सवा बिले दिली जात असताना पुरेसा वीज पुरवठा केला जात नाही. याबाबत ठाणेकरांमध्ये संतापाचे वातावरण असून पुरवठा नियमित न केल्यास महावितरण कार्यालयास घेराव घालू असा इशारा केळकर यांनी दिला आहे.

Read more

गरोदर, स्तनदा स्त्रियांसाठी टेस्ट, ट्रीटमेंट आणि टॉक या त्रिसूत्रीचा वापर

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील माता मृत्यू रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने महत्वाचे पाऊल उचलले असून मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशाने मातामृत्यू रोखण्यासाठी गरोदर, स्तनदा मातांची टेस्ट, ट्रीटमेंट करण्याबरोबर महिलांशी आरोग्यदायी संवादही साधला जाणार आहे.

Read more

पूरग्रस्तांसाठी भाजपाच्या वतीने १५ ट्रक मदत साहित्य रवाना

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ठाण्यातून मदतीचे हजारो हात सरसावले आहेत. ठाणे शहर भाजपाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या मदत यज्ञात जमा करण्यात आलेली मदत १५ ट्रकद्वारे कोकण व पश्चिम महाराष्ट्राकडे पाठविण्यात आली.

Read more