गृहनिर्माण संस्थांच्या मेळाव्याचं येत्या रविवारी आयोजन

आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं गृहनिर्माण संस्थांच्या मेळाव्याचं येत्या रविवारी आयोजन करण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपूर्ण विकास, गृहनिर्माण संस्थांचा बदललेला कायदा आणि गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्यांविषयी या मेळाव्यात चर्चा होणार आहे. स्वयंपूर्ण विकासाविषयी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं कार्यादेश काढला होता मात्र त्यानंतर त्याची अंमलबजावणी झालेली नाही. महापालिका स्तरावर याची कार्यवाही सुरू करावी यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सर्व गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सभासद यांनी उपस्थित राहून स्वयंपूर्ण विकास कसा करता येईल यासाठी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading