जिल्ह्यात बालकांसाठी विशेष गोवर-रुबेला लसीकरण अभियान

जिल्ह्यात गोवर-रुबेलाचा उद्रेक नियंत्रीत करण्यासाठी भिवंडी, कल्याण, अंबरनाथ,मुरबाड, शहापुर या तालुक्यात तसेच अंबरनाथ – बदलापूर नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन टप्प्यात विशेष गोवर-रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे.

Read more

जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

जल जीवन सर्वेक्षण 2023 चा भाग म्हणून ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या “स्वच्छ जल से सुरक्षा” अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Read more

ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी 1 ते 15 डिसेंबर कालावधीत मोहिम

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये नादुरूस्त सेप्टीक शौचालयाच्या कामाची दुरूस्ती आणि एक खड्डा शौचालय असणा-या कुटुबांना दोन खड्डा शोषखड्डा शौचालय तयार करण्यासाठी 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

Read more

महाआवास योजनेतील उत्कृष्ट कामाबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचा राज्यस्तरावर गौरव

केंद्र आणि राज्य शासनाच्या महाआवास अभियानातंर्गत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचा मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Read more

जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा हागणदारी मुक्त ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याचे जिल्हा परिषदेचं आवाहन

जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा हागणदारी मुक्त ठेवण्यासाठी 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

Read more

जिल्ह्यातील ग्रामीण भागात 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम

जिल्ह्यातील ग्रामीण भागात 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार असून यावेळी कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात तसेच बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील सुमारे 1652 शाळांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी दिली.

Read more

जिल्हा परिषद कर्मचा-यांना जुन्या नियमानुसार निवृत्ती वेतन मिळावं या मागणीसाठी बाईक रॅली

जिल्हा परिषद कर्मचा-यांना जुन्या नियमानुसार निवृत्ती वेतन मिळावं या मागणीसाठी बाईक रॅली काढण्यात आली होती.

Read more

प्रत्येक सरपंचाने आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःच पुढाकार घेवून गावे स्वच्छ ठेवावीत – कपिल पाटील

स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत प्रत्येक सरपंचाने आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःच पुढाकार घेवून गावे स्वच्छ ठेवावीत, असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी केले.

Read more

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याच्या रूपाली सातपुते यांच्या सूचना

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी दिल्या.

Read more

जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास तातडीने टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा- रुपाली सातपुते

लंपी आजार जनावरांपासून माणसांना होण्याची शक्यता अजिबात नसून, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने मनुष्यांला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. जिल्ह्यातील पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास अथवा लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी अथवा १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी केले आहे.

Read more