स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी दिल्या. जिल्हयातील सर्व गटविकास, विस्तार अधिकारी आणि सर्व खाते प्रमुख यांची जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना त्यांनी सुचना दिल्या. या अभियान काळात जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये शासन स्तरावरून घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच त्याचे व्हीडीओ तयार करुन त्यांची केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंदी करण्यात याव्यात, अशा सूचना सातपुते यांनी दिल्या. या उपक्रमामध्ये वृक्षारोपण, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छता मोहिम, प्लास्टिक बंदी बाबत ठराव, सरपंच संवाद उपक्रम, स्पर्धा आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच स्वच्छतेसंदर्भात मोठ्या प्रमाणावर जाणीव आणि जागृती करण्याचे नियोजन करण्यात यावे, अशा सुचनाही देण्यात आल्या.