मुलांना पगार मिळाला नाही तर टोल नाक्यावर सोमवारी धिंगाणा घालू असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुलुंड टोल ठेकेदाराला दिला आहे.
MNS
ठाण्याची मनसे ठरली रक्तदाता गौरवाची मानकरी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करणाऱ्या आयोजक संस्थांचा सत्कार १४ जून रोजी करण्यात आला.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात मनसेची महाआरती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात मनसेने महाआरती केली. राज ठाकरे यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी मंगळवारी सायंकाळी कौपिनेश्वर मंदिरात श्री हनुमानाचे पूजन करून महाआरती करण्यात आली.
राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला ठाण्यात हनुमान चालिसा पठण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ठाण्यात विविध मनोरंजनात्मक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गांधीगीरी करीत ठाणेकरांसमोर निर्माण केला एक वेगळा आदर्श
ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गांधीगीरी करीत ठाणेकरांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला.
तीन दिवसात नालेसफाई न झाल्यास पालिका मुख्यालयात कचरा टाकण्याचा मनसेचा इशारा
ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईत हातसफाई सुरु असल्याने याविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानी कापूरबावडी येथील नाल्यात उतरून आंदोलन छेडले.
ठाणे महापालिकेचे अज्ञान उघड – मशिदी, मदरसे, मजारांची माहिती पालिकेकडे नाही
ठाणे महापालिकेचे अज्ञान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड केले आहे. मशिदीवरील भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर ठाण्यातील मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
धार्मिक स्थळांवरील भोंग्यावरून उदभवलेल्या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागे पोलीसांचा ससेमिरा
राज्यभरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यावरून उदभवलेल्या वादामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
ठाण्यातील मनसे नेत्यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा यल्गार केल्याने हादरलेल्या ठाकरे सरकारकडुन पोलिसांचा धाक दाखवला जात आहे. त्यानुसार आता पोलिसांचा ससेमिरा मनसे नेत्यांच्या मागे लागला आहे. ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मनसेच्या वतीने राज ठाकरे यांना तलवार भेट दिली होती, त्यांनतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे याच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भोंगे उतरवा अन्यथा ४ मे पासुन मशिदीसमोर हनुमान चालिसा
मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यत न उतरविल्यास देशभरातील मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्याअनुषंगाने ठाण्यातील मनसे आक्रमक झाली आहे. तसेच कौसा येथील जामा मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यत न काढल्यास ४ मे रोजी मशिदीसमोर भोंगा लावुन हनुमान चालिसा म्हणण्याची परवानगी द्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंब्रा पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.