ठाण्यातील मनसे नेत्यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा यल्गार केल्याने हादरलेल्या ठाकरे सरकारकडुन पोलिसांचा धाक दाखवला जात आहे. त्यानुसार आता पोलिसांचा ससेमिरा मनसे नेत्यांच्या मागे लागला आहे. ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मनसेच्या वतीने राज ठाकरे यांना तलवार भेट दिली होती, त्यांनतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे याच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याच गुन्हाच्या तपासासाठी नौपाडा पोलिसांकडुन मनसेच्या या दोन्ही नेते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ४ मे रोजी मुंब्रा येथील जामा मशीदीसमोर हनुमान चालीसा लावण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली असताना अद्याप पोलिसांकडुन कोणताही प्रतिसाद आलेला नाही असे असताना अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांना येत्या ६ मे रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे. अशा प्रकारचे समजपत्र नौपाडा पोलिसांकडून देण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली.या चौकशीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून या सरकारने जाणीवपूर्वक खोटे गुन्हे नोंदवल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. अशा छोट्या मोठ्या केसेसला आम्ही भीत नसून राज ठाकरे यांच्या आदेशानुसार यापुढील भुमीका आम्ही ठरवणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading