ठाणे महापालिकेचे अज्ञान उघड – मशिदी, मदरसे, मजारांची माहिती पालिकेकडे नाही

ठाणे महापालिकेचे अज्ञान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड केले आहे. मशिदीवरील भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर ठाण्यातील मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी मशिदीबाहेर हनुमानचालिसा लावण्याचा इशारा देऊन प्रशासनासह सरकारला नियमांचे पालन करण्यास भाग पाडले. तसेच ठाण्यात मशिदीचा लेखाजोखा जाणुन घेण्यासाठी, ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या अधिकृत तथा अनधिकृत मशिदी, मदरसे तसेच मजारांची तपशीलवार माहिती ठाणे महापालिकेकडे माहिती अधिकारात मागवली होती. मात्र ही माहिती विभागाकडे उपलब्धच नसल्याचे उत्तर अविनाश जाधव यांना देण्यात आले आहे. सध्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पोलिसांनी मनसैनिकांवर करडी नजर ठेवल्यानंतर मनसेकडूनही आता ठाण्यातील अधिकृत, अनधिकृत अशा सर्व मशिदी, मदरसे तसेच मजारांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. या सर्व मशिदी आणि मदरसे आणि मजारांचे अधिकृत आकडे जाणून घेण्यासाठी अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केंद्रीय माहितीचा अधिकारान्वये माहिती मागविली होती. मात्र यासाठी ठाणे महापालिकेच्या संबंधीत विभागाकडून अविनाश जाधव यांना धक्कादायक उत्तर मिळाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अविनाश जाधव यांना ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या अधिकृत तथा अनधिकृत मशिदी, मदरसे तसेच मजारांची माहितीच उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर धाडण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading