राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला ठाण्यात हनुमान चालिसा पठण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ठाण्यात विविध मनोरंजनात्मक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला म्हणजेच १३ जून रोजी ठाण्यात हनुमान चालिसाचे वाटप आणि पठनाचे कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सप्ताहरुपी विविध कार्यक्रमांचे आयोजन शहराच्या विविध भागात करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
८ जून (बुधवार) – महिला आरोग्य शिबीर आणि पाककला स्पर्धा
९ जून (गुरुवार) – जेष्ठ नागरिक कलागौरव,
१० जून (शुक्रवार) -जेष्ठ नागरिकांना बुस्टर डोस
११ जून (शनिवार)भजन स्पर्धा
१२ जून (रविवार) रोजगार मेळावा
१३ जून (सोमवार) हनुमान चालिसा पठण आणि वाटप
१४ जून (मंगळवार) महाआरती आणि प्रसाद वाटप

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading