अन्न साखळी व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी महिला आणि बाल विकास विभाग तसंच आयआयटी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने अन्न साखळी व्यवस्थापन कार्यशाळा डॉ. रुपल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

Read more

कृषि विभागाच्या चित्ररथाद्वारे गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत पौष्टिक तृणधान्यासंदर्भात जनजागृती

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित शोभा यात्रेमध्ये ठाणे जिल्हा कृषि विभागाच्या वतीने पौष्टिक तृणधान्य विषयक जनजागृती रथाने सहभाग नोंदवून नागरिकांना तृणधान्याचे महत्त्व पटवून दिले.

Read more

‌जिल्हा परिषद अर्थसंकल्पाचे सादरीकरण

विविध नाविन्यपूर्ण योजनेचा समावेश असणारा २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प ८६.९० कोटी आणि मूळ अर्थ संकल्प २०२३-२४ च्या माध्यमातून ९२.८९ कोटी इतका अर्थसंकल्पीय निधी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदल यांनी सभागृहात सादर केला. विविध योजना नागरिकांपर्यत पोहचवण्यासाठी नव्यानेच समावेश केलेल्या योजनांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

Read more

जिल्ह्यातील पाच पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहिर

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि पाच पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण या आरक्षणासाठी चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. शालेय विद्यार्थी आकाश सिंग याने चिठ्ठी काढून सोडत काढली.

Read more

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि 5 पंचायत समित्यांच्या सभापती पदाची 9 जानेवारीला आरक्षण सोडत

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षणाची घोषणा व 5 पंचायत समित्यांच्या सभापती पदाची आरक्षण सोडत  दि. 09 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात दु. 12.00 वा काढण्यात येणार आहे.

Read more

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शहापूर तालुक्यातील विविध विकास कामांना भेट

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेली नडगाव क्लस्टरमधील कामे, वनराई बंधाऱ्यांची कामे तसेच जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कार्ड वाटप आदी शहापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरु असलेल्या उपक्रमांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी पाहणी केली आणि ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले.

Read more

पहिल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांनी दिली भेट

स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अतंर्गत केंद्र आणि राज्य स्तरावरुन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा आणि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत सुचना दिल्या जातात. त्यानुषंगाने जिल्हयातील भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व सदस्यांनी पुढाकार घेवुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या प्रकल्पास ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील आणि इतरांनी भेट देवून तेथील प्रकल्पाची पाहणी केली.

Read more

जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

जल जीवन सर्वेक्षण 2023 चा भाग म्हणून ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या “स्वच्छ जल से सुरक्षा” अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Read more

ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी 1 ते 15 डिसेंबर कालावधीत मोहिम

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये नादुरूस्त सेप्टीक शौचालयाच्या कामाची दुरूस्ती आणि एक खड्डा शौचालय असणा-या कुटुबांना दोन खड्डा शोषखड्डा शौचालय तयार करण्यासाठी 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

Read more

महाआवास योजनेतील उत्कृष्ट कामाबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचा राज्यस्तरावर गौरव

केंद्र आणि राज्य शासनाच्या महाआवास अभियानातंर्गत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचा मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Read more