पहिल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांनी दिली भेट

स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अतंर्गत केंद्र आणि राज्य स्तरावरुन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा आणि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत सुचना दिल्या जातात. त्यानुषंगाने जिल्हयातील भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व सदस्यांनी पुढाकार घेवुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या प्रकल्पास ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील आणि इतरांनी भेट देवून तेथील प्रकल्पाची पाहणी केली. काल्हेर ग्रामपंचायत ही ठाणे शहरालगताची दाट लोकवस्तीची ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापनाबाबतची खुप मोठी समस्या होती. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व सदस्यांनी पुढाकार घेऊन गावातील घनकच-याची समस्या सोडविण्यांसाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा प्रकल्प उभा करण्यांसाठी निर्धार करून अवघ्या 8 महिन्यात प्रकल्प पुर्ण केला आहे. या प्रकल्पात ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कच-यापासून त्याचे खत निर्मिती करण्यांत येते तर सुका कचरा प्रकारानुसार वर्गीकरण करून भंगार म्हणून बाजारात विकला जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading