कल्याण ग्रामीणमध्ये जोरदार चुरस – आता म्हात्रे आघाडीवर

कल्याण ग्रामीण मतदारसंघात जोरदार टक्कर सुरू असून आता शिवसेनेचे रमेश म्हात्रे आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना ३२ हजार ८८५ मतं पडली आहेत तर राजू पाटील यांना ३१ हजार ३५७ मतं मिळाली आहेत. १२.००ची ताजी माहिती

संजय केळकर यांच्या आघाडीत घट

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर १० हजार १०७ मतांनी आघाडीवर आहेत. संजय केळकर यांना ३७ हजार ३५ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना २६ हजार ९२८ मतं पडली आहेत. ११.५० ची ताजी माहिती

कल्याण ग्रामीण मतदारसंघात जोरदार टक्कर

कल्याण ग्रामीण मतदारसंघात जोरदार टक्कर सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील अवघ्या १७७ मतांनी आघाडीवर आहेत. राजू पाटील यांना २९ हजार ३०३ मतं आहेत तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना २९ हजार १२६ मतं पडली आहेत. ११.४०ची ताजी माहिती

कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ भोईर ८ हजार ३१८ मतांनी आघाडीवर

कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ भोईर ८ हजार ३१८ मतांनी आघाडीवर आहेत.

Read more

संजय केळकर ११ हजार ९७३ मतांनी पुढे

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर ११ हजार ९७३ मतांनी आघाडीवर आहेत. संजय केळकर यांना ३४ हजार ८०१ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना २२ हजार ८२८ मतं पडली आहेत. ११.३० ची ताजी माहिती

एकनाथ शिंदे २१ हजार ९९३ मतांनी पुढे

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे एकनाथ शिंदे २१ हजार ९९३ मतांनी आघाडीवर आहेत.

Read more

जितेंद्र आव्हाड २१ हजार १५१ मतांनी पुढे

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड २१ हजार १५१ मतांनी आघाडीवर आहेत. जितेंद्र आव्हाड यांना ३८ हजार ३०२ तर शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांना १७ हजार १५१ मतं मिळाली आहेत. ११.१५ ताजी माहिती

प्रताप सरनाईक २३ हजार ८४० मतांनी पुढे

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात २३ हजार ८४० मतांनी शिवसेनेचे प्रताप सरनाईक आघाडीवर आहेत. प्रताप सरनाईक यांना २८ हजार ९८३, काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना ५ हजार १४३ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप पाचंगे यांना ३ हजार ८६२ मतं मिळाली आहेत. ११.१५ ची ताजी माहिती

संजय केळकर ८ हजार ३९३ मतांनी आघाडीवर

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर हे ८ हजार ३९३ मतांनी आघाडीवर आहेत. संजय केळकर यांना २४ हजार १३५ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना १५ हजार ७४२ मतं पडली आहेत. ११ वाजताच्या अपडेट नुसार

जितेंद्र आव्हाड १६ हजार ८९२ मतांनी आघाडीवर

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड १६ हजार ८९२ मतांनी आघाडीवर आहेत. जितेंद्र आव्हाड यांना ३० हजार ६६८ तर शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांना १३ हजार ७७६ मतं मिळाली आहेत.