शिवसेनेचे प्रताप सरनाईक १६ हजार ७०५ मतांनी आघाडीवर

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात १६ हजार ७०५ मतांनी शिवसेनेचे प्रताप सरनाईक आघाडीवर आहेत. प्रताप सरनाईक यांना २० हजार ३७२, काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना ३ हजार ६६७ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप पाचंगे यांना २ हजार ५७९ मतं मिळाली आहेत.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना १५ हजार १३ मतांची आघाडी

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे एकनाथ शिंदे १५ हजार १३ मतांनी आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांना १८ हजार ४५२ तर काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांना ३ हजार ४३९, वंचित बहुजन आघाडीच्या उन्मेश बागवे यांना ८११ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महेश कदम यांना २ हजार ५०५ मतं मिळाली आहेत.

संजय केळकर ५ हजार ५३२ मतांनी आघाडीवर

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर हे ५ हजार ५३२ मतांनी आघाडीवर आहेत. संजय केळकर यांना १६ हजार ७९४ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना ११ हजार २६२ मतं पडली आहेत.

जिल्ह्यात सरासरी ५० टक्के मतदान

जिल्ह्यामध्ये विधानसभेसाठी झालेल्या मतदानात सर्वाधिक मतदान हे मुरबाड विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात झालं आहे.

Read more

जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील दुपारी १वाजेपर्यंतची टक्केवारी

जिल्ह्यामध्ये विधानसभेसाठी मतदान सुरू असून मतदान संथगतीने होत आहे.

Read more

ठाण्यात पहिल्या चार तासात साडेबारा टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. मात्र मतदान हे अतिशय संथगतीनं सुरू
असल्याचं दिसून आलं.

Read more

विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्रात मोबाईल वापरास मनाई

विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्रात मोबाईल वापरास मनाई करण्यात आली आहे.

Read more

विधानसभा निवडणुकीत मतदान करताना मतदाराकडे ओळखपत्र आवश्यक

विधानसभा निवडणुकीत मतदान करताना मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र आवश्यक असून ते नसल्यास इतर ११ दस्तऐवजांचा ओळखीचा पुरावा म्हणून मतदान केंद्रावर ग्राह्य धरलं जाणार आहे.

Read more

सोमवारी ६३ लाख मतदार ठरवणार जिल्ह्यावर कोणाचं वर्चस्व

सोमवारी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या मतदानात जिल्ह्यामध्ये ६३ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

Read more

दिव्यांग मतदारांना मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी प्रशासनातर्फे विविध सुविधा

विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Read more