क्लस्टर योजनेत ठाणे महानगरपालिका आणि महाप्रीत यांच्यात सामान्य निर्णायक करारावर स्वाक्षऱ्या

आशिया खंडातील सर्वात मोठी, महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक समूह विकास योजना (क्ल्स्टर) ठाण्यात मूर्त रुप घेत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्प्यातील काम किसननगरमध्ये सुरू झाले आहे. त्याच टप्प्यातील टेकडी बंगला, हाजुरी आणि किसननगर क्लस्टरचा काही भाग विकसित करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने महात्मा फुले नुतनीय उर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेड (महाप्रीत) या शासकीय संस्थेसह करार केला.

Read more

ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार – मुख्यमंत्री

दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले.

Read more

समूह पुनर्विकास योजनेतून घरांची चावी मिळेल तो दिवस आपल्यासाठी परमोच्च आनंदाचा – मुख्यमंत्री

ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचे काम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. सुमारे 1500 हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 10 हजार घरांची निर्मिती होणार आहे. हा एक ऐतिहासिक प्रकल्प होणार आहे. ज्या दिवशी या योजनेतील घराची चावी नागरिकांना मिळेल तो दिवस माझ्यासाठी सर्वात परमोच्च आनंदाचा दिवस असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Read more

समूह विकास योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येत्या सोमवारी

देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या, महत्वाकांक्षी ऐतिहासिक समुह विकास योजना मूर्त रुप घेत असून या महत्वपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

Read more

क्लस्टर योजनेमुळे १८ एसआरए प्रकल्पांना खीळ

प्रक्रिया सुरू असलेल्या १८ एसआरए प्रकल्पांना क्लस्टर योजनेमुळे खीळ बसली असून हजारो गरीब झोपडीधारक हवालदिल झाले आहेत. तर म्हाडाच्या जागेत प्रकल्प राबवणाऱ्या विकासकाने दहा वर्षे उलटूनही रहिवाशांना घरे दिली नसल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली.

Read more

क्लस्टर योजनेसाठी सिडको आणि ठाणे महापालिका यांच्यात सामंजस्य करार

शहरातील बेकायदा धोकादायक इमारतींत जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घरकुल देणाऱ्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेने आज महत्त्वाचा टप्पा गाठला.

Read more

देवेंद्र फडणवीसांना निमंत्रित न केल्याने सामुहिक विकास योजनेच्या भूमीपूजनावर भारतीय जनता पक्षाचा इशारा

सामुहिक विकास योजना प्रकल्प साकारण्यात महत्वाची भूमिका बजाविलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपूजन कार्यक्रमाला न बोलाविल्याच्या निषेधार्थ भाजपने कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more

समूह विकास योजनेच्या ६ आराखड्यांना मंजुरी – उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ठाण्यातील बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी अशा समूह विकास योजनेअंतर्गत ६ शहर पुनर्विकास आराखड्यांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे.

Read more

समूह विकास योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होत असल्याचा महापालिकेचा खुलासा

ठाणे महापालिकेच्या समूह विकास योजनेतील ६ आराखड्यांना राज्य शासनानं मंजुरी दिली असून या योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होत असल्याचा खुलासा महापालिकेनं केला आहे.

Read more