राज्यातील नव्या महाविद्यालयांना १५ जुलैपूर्वी मंजुरी देण्याची निरंजन डावखरेंची मागणी

राज्याच्या विविध भागातून सुमारे ४५० नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव राज्य सरकारला सादर झाले असून या प्रस्तावांना विद्यापीठ अधिनियमानुसार १५ जुलैपूर्वी मान्यता मिळणे गरजेचे आहे. विद्यापीठ अधिनियम लक्षात घेता या महाविद्यालयांच्या प्रस्तावांना मान्यता द्यावी अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Read more

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी न करून ठाकरे सरकारकडून जनतेची लूट

केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे अशी घणाघाती टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

शहापूरमधील पाणीटंचाई सोडविण्यासाठी अमृतकुंभ, मोती, बोडद धरणांची निरंजन डावखरेंची मागणी

शहापूर तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई सोडण्यासाठी, अनेक वर्षांपासून रखडलेले घाटनदेवी येथील अमृतकुंभ जलसागर धरण, बेंडेकोन येथील मोती लघु धरण आणि पेंढरी कलमगाव येथील बोडद लघु धरण उभारावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली आहे.

Read more

खाजगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून वीज समस्या भासविण्याचा महाविकास आघाडीचा कट – निरंजन डावखरे

सामान्य ग्राहकांच्या खिशात हात घालून खाजगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून वीज समस्या भासविण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला.

Read more

घर सोडून गेलेल्या शाखा प्रमुखाचा शोध घेण्याची भारतीय जनता पक्षाची विधानसभेत मागणी

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, शिवसेना पदाधिकाऱ्याकडून सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे शिवसेनेचा एक शाखाप्रमुख घर सोडून निघून गेला आहे. या गंभीर प्रकाराकडे भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधून शाखाप्रमुखाचा शोध घेण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्याची सभापतींकडे विनंती केली.

Read more

नवाब मलिकांचा बार फुसका – भाजपावर आरोप करणारे तोंडघशी

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी हा भाजपा आमदाराच्या पत्नीच्या कंपनीत संचालक असल्याबद्दल केलेल्या आरोपाचा बार फुसका ठरला आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी आज `मायक्रोबायॉलॉजिस्ट’ असलेल्या किरण गोसावींना आज पत्रकार परिषदेत समोर आणले.

Read more

महापालिकेच्या ‘लेट लतीफ’ कारभारामुळे गडकरी रंगायतनमध्ये तिसरी घंटा वाजणारच नाही – निरंजन डावखरेंची टीका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मराठी नाट्यप्रेमींकडून नाट्यगृहे उघडण्याची वाट पाहिली जात असतानाच, ठाणे महापालिकेच्या ‘लेट लतीफ’ कारभारामुळे गडकरी रंगायतनमध्ये नाटकाची २२ ऑक्टोबरला तिसरी घंटा वाजणारच नाही अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची निरंजन डावखरेंची मागणी

मुंब्रा येथील लकी कंपाऊंडमध्ये झालेल्या दुर्घटनेतील अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईच्या धर्तीवर घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

व्हॉट्स अॅप मेसेजवर काढून टाकलेले ग्लोबलचे कर्मचारी अखेर पुन्हा कामावर

ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत ५० डॉक्टर आणि २०२ नर्स यांच्यासह वॉर्डबॉयला व्हॉट्स अॅप मेसेजद्वारे कामावरून काढून टाकण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात भारतीय जनता पक्षानं आवाज उठविल्यावर कंत्राटदाराने नमते घेऊन पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले.

Read more

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे कर्ज घेण्याची वेळ – निरंजन डावखरे

ठाणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केलेला सततचा भ्रष्टाचार आणि कंत्राटदारांच्या केलेल्या लाडामुळे महापालिकेवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली आहे.

Read more