घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची निरंजन डावखरेंची मागणी

मुंब्रा येथील लकी कंपाऊंडमध्ये झालेल्या दुर्घटनेतील अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईच्या धर्तीवर घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. कळवा येथील घोलाईनगरमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमी नागरिकांची आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयात विचारपूस केली. तसेच त्या भागातील रहिवाशांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.कळवा येथील डोंगराच्या परिसरात अनेक वर्षांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. मात्र, ती वेळीच रोखण्यास सत्ताधारी लोकप्रतिनिधी व महापालिकेचे अधिकारी अपयशी ठरले. या प्रकारात सामान्य माणसांचा नाहक बळी गेला. त्यामुळे मुंब्रा येथील लकी कंपाऊंडच्या धर्तीवर जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. घोलाईनगरमधील पाच जणांच्या कुटुंबाच्या मृत्यूला महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप आमदार डावखरे यांनी केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading