राष्ट्रवादीच्या महिलांनी पाणीपुरवठा कार्यालयास ठोकले टाळे

गेले चार दिवस मुंब्रा, कौसा आणि कळवा भागात पाणीपुरवठा बंद आहे. गेले काही महिने हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे संतापलेल्या नगरसेविका फरझाना शेख आणि युवती कार्यकर्त्या मर्जिया पठाण यांनी कौसा येथील पाणीपुरवठा कार्यालयास टाळे ठोकले.

Read more

गॅस सिलेंडरमध्ये झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंतप्रधान मोदींचे आभार मानणारे उपहासात्मक फलक

गॅस सिलेंडरमध्ये झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंतप्रधान मोदींचे आभार मानणारे उपहासात्मक फलक लावण्यात आले होते.

Read more

गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात आज मुंब्रा येथील तलाठी कार्यालयासमोर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले.

Read more

जनआशीर्वाद यात्रेवर कोटी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक चर्चेचा विषय

आधी केलेले पाप धुऊन काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर असलेले अनेक फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरातील विविध पेट्रोल पंपांच्या बाहेर लावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर गगनाला भिडू लागले आहेत. एकीकडे महागाईने उच्चांक गाजलेला असतानाच भारतीय जनता पक्षाने जनआशीर्वाद यात्रा काढली आहे.

Read more

नगरसेवकांचे आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाल्यानं राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उधळली महापालिकेची सर्वसाधारण सभा

ठाणे शहरामध्ये केवळ प्रशासनाच्या मनमर्जीवर लसीकरणाची शिबिरे आयोजित करण्यात येत असतात. मात्र, विरोधी पक्षातील नगरसेवकांनी लसीकरणासाठी शिबिराची मागणी केल्यानंतरही लसीकरण शिबिर राबविण्यात येत नाही. तसेच, अनेकदा महासभेमध्ये प्रशासनाच्या विरोधात बोलल्यास आवाज बंद केला जात आहे. या निषेधार्थ विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महासभा उधळून लावली.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोकणात वैद्यकीय साधनांसह 12 डॉक्टरांची टीम कोकणात रवाना

अतिवृष्टीमुळे कोकणाची पुरती वाताहत झाली आहे. कोकणी माणसांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या असतानाच पुरामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोकणात वैद्यकीय साधनांसह 12 डॉक्टरांची टीम कोकणात रवाना झाली.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.

Read more

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार फलकबाजी

भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळात इंधन दरवाढीचा आलेख वाढतच असून या महिन्यात १४ वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाण्यात जोरदार फलकबाजी करण्यात आली.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तीन महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार

सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशा स्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करीत आहे. केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने लसीकरणासह अनेक बाबतीत सरकारची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खारीचा वाटा म्हणून ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपले तीन महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी दिली.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

Read more